
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. भुजबळ यांनी नुकतेच ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. तसेच संपर्कात आलेल्या व्यक्तींनी कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी. माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी. मास्क,सॅनिटायझरचा नियमित वापर करा.
माझी कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे. गेल्या दोन तीन दिवसात माझ्या संपर्कात अलेल्या सर्वांनी आपली कोरोना टेस्ट करून घ्यावी.माझी प्रकृती उत्तम असून काळजी करण्याचे कारण नाही.कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.मास्क,सॅनिटायझर चा नियमित वापर करा.#COVID19
— Chhagan Bhujbal (@ChhaganCBhujbal) February 22, 2021
छगन भुजबळ गेले दोन दिवसांपासून नाशकात होते. यावेळी साहित्य संमेलानासंदर्भात त्यांच्या अनेकांशी गाठीभेटी झाल्या होत्या. यासंदर्भात रविवारी दुपारी एक पत्रकार परिषद देखील घेण्यात आली होती. त्यामुळे साहित्य संमेलानाच्या तयारीच्या निमित्ताने जमलेल्या आणि भुजबळ यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना कोरोना चाचणी करावी लागणार आहे.