Breaking – 8 पोलिसांची हत्या करणाऱ्या विकास दुबेचा एन्काऊंटर

उत्तर प्रदेशच्या कानपूर येथे 8 पोलिसांची हत्या करणारा विकास दुबेला मध्य प्रदेशातून घेऊन जाणाऱ्या विशेष पथकाच्या (एसटीएफ) ताफ्याच्या गाडीला अपघात झाला. या अपघातावेळी विकास दुबे गाडीतून पळाला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात तो गंभीर जखमी झाला. मात्र रुग्णालयात त्याला मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे. एन्काऊंटर टाळण्यासाठी विकास गुरुवारी अशा प्रकारे पोलिसांच्या समोर आल्याचे सांगण्यात येत होते.

गुरुवारी विकासला उज्जैन येथील महाकाल मंदिर परिसरातून अटक करण्यात आली होती. मध्य प्रदेशातून अटक केलेला गँगस्टर विकास दुबेला घेऊन हा ताफा पहाटे कानपूर येथे पोहोचत होता. ही घटना बर्रा पोलीस स्टेशन परिसरातील आहे. या अपघातादरम्यान कार उलटी झाली. दरम्यान पोलिसांनी पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या विकास दुबेचा एन्काउटर केला.

आपली प्रतिक्रिया द्या