Breaking – सांगली महापौरपदी महाविकासआघाडीचे दिग्विजय सूर्यवंशी विजयी, भाजपला धक्का

digvijay-suryavanshi-sangli

सांगली महापौरपदी महाविकास आघाडीचे दिग्विजय सूर्यवंशी हे विजयी झाले आहेत. सूर्यवंशी यांनी भाजपाचे धीरज सूर्यवंशी यांचा 39 विरुद्ध 36 मतांनी पराभव केला. हा पराभव म्हणजे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना जबरदस्त धक्का असल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेस पक्षाचे नेते राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी मारली बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

एकूण मतदार 78 पैकी 1 सदस्याचा मृत्यू झालेला असल्याने 77 मतदार होते. यापैकी 2 जणांनी मतदानावेळी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली. तर उरलेल्या सदस्यांपैकी दिग्विजय सूर्यवंशी यांना 39 तर धीरज सूर्यवंशी यांना 36 मते पडली. अशा प्रकारे महापौर म्हणून दिग्विजय सूर्यवंशी 39 मतांनी विजयी घोषित करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या