वाशीच्या एपीएमसी फळबाजार गोदामात आगीचा भडका, चार दुकानं जळून खाक

वाशीच्या एपीएमसी फळबाजार परिसरातील गोदामात आगीचा भडका उडाला आहे. या आगीत चार दुकानं जळून खाक झाली आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. आगीचं कारण अद्याप अज्ञात आहे.