BREAKING NEWS : जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याविरोधातील याचिकेवर सुनावणीसाठी SC तयार, वाचा कधी होणार सुनावणी

जम्मू-कश्मीरमधून कलम 370 हटवण्याविरोधातील याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय तयार आहे. या प्रकरणाची सुनावणी दसऱ्यानंतर होणार आहे. या प्रकरणाशी संबंधित एका वकिलाने सरन्यायाधीश यूयू ललित यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. अशी मागणी करण्यामागे हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असल्याचे ते म्हणाले. सरन्यायाधीश म्हणाले की ते या प्रकरणाचा ते सुनावणीसाठी यादीत निश्चित समावेश करतील. दसऱ्याच्या सुटीनंतर त्यावर सुनावणी होणार आहे. 2019 मध्ये हटवण्यात आलेल्या कलम 370 संदर्भात सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल झाल्या होत्या. हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे पाठवण्यात आले होते, परंतु फेब्रुवारी 2020 नंतर या प्रकरणावर सुनावणी झाली नाही.

5 ऑगस्ट 2019 मध्ये केंद्राने जारी केलेल्या अधिसूचनेनंतर जवळजवळ चार महिन्यांनी डिसेंबर 2019 मध्ये कलम 370 प्रकरणांची सुनावणी 5 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुरू झाली. पाच न्यायाधीशांच्या खंडपीठांमध्ये मतभेद असल्याने हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवायचे की नाही, असा प्राथमिक मुद्दा या प्रकरणात निर्माण झाला. 2 मार्च 2020 रोजी दिलेल्या निकालात, घटनापीठाने असे म्हटले की कलम 370 संदर्भात जारी केलेल्या राष्ट्रपतींच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या मोठ्या खंडपीठाकडे प्रकरण पाठवण्याची गरज नाही. 2 मार्च 2020 पासून याचिकांवर सुनावणी झालेली नाही. त्यानंतर कोरोनामुळे न्यायालयात व्हर्च्युअल सुनावणी सुरू झाली.