ब्रायन लारा रुग्णालयात; आज डिस्चार्ज मिळणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

वेस्ट इंडीजचा माजी दिग्गज क्रिकेटपटू ब्रायन लारा याच्या छातीत दुखू लागल्यानंतर त्याला मंगळवारी ग्लोबल रुग्णालयात दाखल केले असून आज त्याला डिस्चार्ज देणार आहेत. वर्ल्ड कपच्या निमित्ताने ब्रायन लारा मुंबईत एका क्रीडा वाहिनीवर ‘क्रिकेट एक्सपर्ट’ म्हणून काम करीत आहे.

दरम्यान, ब्रायन लाराच्या तब्येतीबाबत रुग्णालय व्यवस्थापनाने गोपनीयता ठेवली असली तरी त्याच्यावर अँजिओग्राफी केल्याचे वृत्त आहे. आता माझी तब्येत ठणठणीत असून रुग्णालयातील बेडवर बसून ऑस्ट्रेलिया-इंग्लंड लढतीचा आनंद घेत आहे, असे ट्वीट रात्री उशिरा ब्रायन लाराने केले.