आश्चर्य…नवरीने 9 महिन्यांच्या प्रवासात विणला स्वत:करिता ‘टोमॅटो वेडिंग ड्रेस’

आपल्या लग्नसोहळ्याला कसा पेहराव करायचा याविषयी प्रत्येक तरुणीला उत्सुकता असते. भरजरी शालू, पैठणी, वेडिंग गाऊन जो पेहराव असेल तो सगळ्यात बेस्ट असावा असंच प्रत्येकीलाच वाटत असतं. त्यातच जर एखाद्या ड्रेस डिझायनरचं लग्न असेल तर ? ती नक्कीच तिचा वेडिंग ड्रेस खास असावा यासाठी प्रयत्न करणार. न्यूयॉर्कमध्ये राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या लग्नाकरिता अनोखा पोषाख स्वत: विणला.

एस्थर अँड्युज असे या ड्रेस डिझायनर तरुणीचे नाव आहे. तिचे लग्न ठरल्यावर तिने आपला वेडिंग ड्रेस स्वत:च विणायचे ठरवले. एवढेच नाही तर ती ऑफिसला जाताना न्यूयॉर्क सीटी सबवेदरम्यान कराव्या लागणाऱ्या मेट्रोच्या येण्या-जाण्याच्या प्रवासात मिळणाऱ्या वेळात दररोज हे ड्रेसचे विणकाम करत असे.

नवरी होणारी एस्थर अँड्र्युज मेट्रोमध्ये बसून वेडिंग ड्रेस विणत असतानाचा व्हिडियो तिने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या ड्रेसला तिने ‘लग्नासाठी टोमॅटो वेडिंग ड्रेस’ असे नाव दिले असून तो कसा विणायचा याविषयी सगळी माहितीही दिली आहे शिवाय ‘मी एनवायसी सबवेतून मेट्रोने केलेल्या 9 महिन्यांच्या प्रवासात माझ्या लग्नाकरिता ड्रेस विणला. हा या ड्रेसचासुद्धा प्रवास आहे’, अशा भावनाही व्यक्त केल्या आहेत.

एस्थर अँड्र्युज या ड्रेसविषयी सांगते की, लग्नाच्या या अनोख्या पोषाखाकरिता 21,000 फूट मोहायर लेस वापरली आहे. या लेसनेच ड्रेसचे लांब हात आणि इतर सर्व भाग विणले असून या ड्रेसला टोमॅटो लावण्याचीही तिची इच्छा होती. आश्चर्य म्हणजे तिने नवरा आणि त्याच्या मित्रांकरिताही ड्रेस तयार केला आहे. नवऱ्याचा पोषाख अंतराळ वीरासारखा तयार केला आहे. लोकांनी तिने विणलेल्या टोमॅटो वेडिंग ड्रेसचे विशेष कौतुक केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या