आमची सेवाग्राम एक्सप्रेस परत करा! चंद्रपूरकरांची मागणी, रेल्वे प्रशासनाविरोधात काळे झेंडे दाखवत आंदोलन

black-flags-chandrapur-rail

 

चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीने काळे झेंडे दाखवत रेल्वे प्रशासनाविरोधात रेल्वे स्टेशनवर नारेबाजी करत आंदोलन केलं. चंद्रपूर हे राज्यातील महत्त्वपूर्ण औद्योगिक महानगर असताना येथील नागरिकांना रेल्वेच्या सुविधा मिळत नाहीत. यासाठी अनेक वेळा निवेदन दिले, मंत्री अधिकारी सर्वांच्या भेटी घेतल्या. परंतु 2019 नंतर रेल्वे विभागाचे दुर्लक्ष झाले. रेल्वे यात्री सुविधा समिती चंद्रपुरात आली, त्यांनी ही मागण्यांची दखल घेतली नाही. म्हणून आज पासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा इशारा चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीने विभागीय रेल्वे प्रशासनाला दिला आहे.

यावेळी चंद्रपूर रेल्वे सुविधा संघर्ष समितीचे कार्याध्यक्ष दामोदर मंत्री, सचिव नरेंद्र सोनी, रमणिकभाई चव्हाण, प्रदीप माहेश्वरी,पूनम तिवारी, रमेश बोथरा, डॉ भुपेश भलमे, डॉ मिलिंद दाभोरे, नरेश लेखवाणी, संजय मंगाणी, अशोक रोहरा, श्याम सारडा, गौतम यादव व शंकरसिंह राजपुरोहित यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.

आमची सेवाग्राम एक्सप्रेस परत करा!

कोरोनामुळे मुंबईला जाण्यासाठी सर्वांना उपयुक्त असलेली गाडी बंद करण्यात आली. ही गाडी सर्वांसाठी जणू संजीवनी होती. ती बंद असल्याने सामान्य प्रवाश्यांचे हाल होत आहेत. त्यामुळे आमची सेवाग्राम एक्सप्रेस परत करा, अशी मागणी यावेळी डॉ. भुपेश भलमे यांनी केली.