ब्रिस्बेनमध्ये सिडनीची पुनरावृत्ती; ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची सुंदर, सिराजला शिविगाळ

सिडनी कसोटीदरम्यान मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराहवर ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी वर्णद्वेषी टिप्पणी केली होती, तसेच शिविगाळही केली होती. तो वाद अद्यापही कायम असताना आता आजपासून ब्रिस्बेनमध्ये सुरू झालेल्या कसोटीतही असाच प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

ब्रिस्बेन कसोटीच्या पहिल्या दिवशी मैदानावर क्षेत्ररणासाठी उतरलेल्या टीम इंडियाच्या खेळाडूंसोबत ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी गैरवर्तन केले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना फिरकीपटू वाशिंग्टन सुंदर आणि वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला प्रेक्षकांनी शिविगाळ केली. याबाबत ऑस्ट्रेलियन वृत्तपत्र ‘सिडनी मॉर्निंग हेराल्ड’ने सविस्तर वृत्त दिले आहे.

वृत्तानुसार, काही प्रेक्षकांनी वाशिंग्टन सुंदर आणि मोहम्मद सिराजला उद्देशून अपशब्द वापरले. केट नावाच्या प्रेक्षकाने सांगितले की, त्याच्या आजूबाजूला बसलेले काही प्रेक्षक सिराज आणि सुंदरला शिविगाळ करत होते. विशेष म्हणजे सलग दुसऱ्या कसोटीत हा प्रकार घडल्याने क्रीडाप्रेमींनी संताप व्यक्त केला असून अशा प्रेक्षकांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

सिडनीत वर्णद्वेषी टिका

दरम्यान, याआधी सिडनीमध्ये झालेल्या कसोटीत प्रेक्षकांनी मोहम्मद सिराजवर वर्णद्वेषी टिका केली होती. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना हा प्रकार घडला होता. सिराजने तात्काळ कर्णधार अजिंक्य रहाणे आणि पंचांना याबाबत माहिती दिली. रहाणेने सिराजला पाठिंबा देत सामना रोखून धरला होता. अखेर मैदानावरील पोलिसांनी ‘त्या’ प्रेक्षकांना बाहेरचा रस्ता दाखवल्यानंतर सामना पुन्हा सुरू झाला होता.

टी. नटराजनने इतिहास रचला, वीरेंद्र सेहवागने सलाम ठोकला

दिग्गजांनी केली निंदा

सिडनीमध्ये झालेल्या प्रकाराबाबत दिग्गज क्रीडापटूंनी प्रतिक्रिया देताना या घटनेची निंदा केली होती. मैदानात असा प्रकार कधीही सहन केला जाऊ शकत नाही, असे सचिन तेंडुलकर, रिकी पॉन्टिंग यांनी म्हटले होते.

INDvsAUS कॅच सोडणे महागात पडले, लाबुशेनचे टीम इंडियाविरुद्ध पहिले शतक

आपली प्रतिक्रिया द्या