दिग्गजांची बोलती बंद! टीम इंडियाने ‘करुन दाखवलं’, ते पण घासून नाही ठासून

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया संघात ब्रिस्बेनमध्ये चौथा आणि निर्णायक कसोटी सामना रंगला. पाचव्या दिवशी टीम इंडियाने 324 धावा काढत सामना आणि मालिका जिंकली. विराट कोहली, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह सारखे स्टार खेळाडू नसतानाही टीम इंडियाने करून दाखवलं आणि ऑस्ट्रेलियन मीडिया, माजी खेळाडूंचे दात घशात घातले.

पाचव्या दिवशी टीम इंडियाला वियासाठी 324 धावांची गरज होती. रोहित शर्मा 7 धावांवर बाद झाला. त्यानंतर मात्र शुभमन गिल आणि पुजारा यांनी ऑसी गोलंदाजीची लक्तरे टांगली. गिल शतकाच्या जवळ पोहचला असताना 91 धावांवर बाद झाला. त्यांनतर रहाणे 24, पुजारा 56 हे देखील माघारी परतले. मात्र यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत याने एक बाजू लावून धरत अखेरपर्यंत फलंदाजी केली आणि सामना जिंकूनच माघारी परतला.

INDvsAUS इतिहासाची पुनरावृत्ती! विराटच्या जन्माच्या वेळी जे घडलं तेच त्याच्या मुलीच्या जन्मवेळीही घडलं

बोलती बंद झाली ना भाऊ…

टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहली पितृत्व रजा घेऊन माघारी परतला आणि ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंना उकळ्या फुटू लागल्या. विराट नसताना हा संघ काहीच नाही अशा आवेशात त्यांनी वक्तव्य केली.

‘तुम्ही विराटशिवाय टीम इंडियाच्या फलंदाजीची कल्पनाही करू शकत नाही. हा संघ खूप अडचणीत येणार आहे’ – मायकल क्लार्क, माजी कर्णधार

विराट नसल्याने व्हाईट वॉश देण्याची चांगली संधी आहे – रिकी पॉण्टिंग, माजी कर्णधार

अॅडलेडमध्ये ज्या प्रकारे ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पराभूत केले ते पाहून मला व्हाईट वॉश दिसतोय – मार्क वॉ, माजी कर्णधार

मला असे वाटते त्यांना अॅडलेड जिंकण्याची संधी होती, पण आता ते मालिकेत पुनरागम करू शकणार नाहीत – ब्रॅड हॅडिन, माजी यष्टीरक्षक

अॅडलेडमध्ये 36 धावांत बाद झाल्यानंतर, विराट माघारी परतल्यावर ऑस्ट्रेलियाची हे माजी खेळाडू व्हाईट वॉशची स्वप्न बघत होती. परंतु त्यांना माहिती नव्हते हा नवा हिंदुस्थान आहे, लढणार पण आणि जिंकणार पण.

aus-v-ins

आपली प्रतिक्रिया द्या