INDvsAUS इतिहासाची पुनरावृत्ती! विराटच्या जन्माच्या वेळी जे घडलं तेच त्याच्या मुलीच्या जन्मवेळीही घडलं

ऐतिहासिक… अवर्णनीय आणि अविस्मरणीय… गाबावर ऑस्ट्रेलियाच्या संघाचे टीम इंडियाने गर्वहरण केले. ब्रिस्बेन कसोटीच्या पाचव्या दिवशी गिल, पुजारा, पंत यांनी केलेल्या अर्धशतकीय खेळीच्या बळावर टीम इंडियाने चौथी कसोटी आणि मालिका खिशात घातली.

ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांचे आव्हान दिले होते. गाबाचा रेकॉर्ड पाहता आजपर्यंत एकाही संघाला चौथ्या डावात 250 हुन अधिक धावांचा पाठलाग करता आला नव्हता. पण म्हणतात ना जो लढतो, तोच जिंकू शकतो. अखेरपर्यंत रंगलेला सामना टीम इंडियाने 3 विकेट्सने जिंकला आणि ‘गाबा’वर ऑस्ट्रेलियाचे वस्त्रहरण झाले.

सिडनी कसोटी सुरू असताना ऑस्ट्रेलियाची प्रसार माध्यमे आणि खुद्द कर्णधार टीम पेन गाबावर या, तिथे दाखवू असे म्हणत होते. पण झाले उलटेच. दुखपतीने ग्रस्त असलेल्या नवख्या टीम इंडियाने अनुभवी ऑस्ट्रेलियन संघाला अक्षरशः लोळवले. त्यामुळे भविष्यात आता ऑस्ट्रेलियाची टीम ‘ब्रिस्बेनमध्ये या मग हरवतो’ असेही बोलू शकणार नाही.

विराटच्या जन्मावेळी घडलं तसेच मुलीच्या जन्मावेळी घडलं

ऑस्ट्रेलियाचा संघ 1988 पासून गाबावर पराभूत झालेला नव्हता. नोव्हेंबर 1988 मध्ये वेस्ट इंडिजने ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता, तोच अंतिम. नोव्हेंबर 1988 मध्येच टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली याचा जन्म झाला होता. आता 11 जानेवारी 2002 रोजी विराटच्या मुलीचा जन्म झाला. योगायोगाची गोष्ट म्हणजे पुन्हा तसेच घडले आणि ब्रिस्बेन कसोटीत ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव झाला. आता ब्रिस्बेन टेस्ट जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकून अजिंक्य रहाणेच्या संघाने विराटला मुलीच्या जन्माच्या निमत्ताने सर्वोत्तम भेट दिली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या