ब्रिटनने तोडली कोरोनाची साखळी; संसर्ग 60 टक्क्यांनी घटला

कोरोना प्रतिबंधक लस आणि लॉकडाऊन या उपायांमुळे ब्रिटनमधील कोरोना संसर्गाचे प्रमाण 60 टक्क्यांनी घटले आहे. ब्रिटनमधील कोविड-19 लसीकरणाच्या कार्यक्रमामुळे या विषाणूचा संसर्ग आणि गंभीर स्वरूपाचा आजार किंवा मृत्यू यांच्यातील साखळी तुटण्याची सुरुवात झाली असल्याचे इंग्लंडमधील महामारीबाबत सुरू असलेल्या अभ्यासाच्या ताज्या निष्कर्षात आढळले आहे. एकीकडे देशव्यापी लॉकडाऊनच्या उपायांनी कोरोनाचा फैलाव कमी झालेला असतानाच मार्च महिन्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण सुमारे 60 टक्क्यांनी कमी झाल्याचे लंडनच्या इंपिरीयल कॉलेजमधील संशोधकांना आढळले. लसीकरण कार्यक्रमात वृद्धांवर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या