मुलाच्या लैंगिक शोषणात महिला अधिकारी दोषी, दिली ही शिक्षा

ब्रिटनमध्ये एका महिला कोठडी अधिकाऱ्याला 15 वर्षाच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याबाबत दोषी ठरवण्यात आलं आहे. देखभालीसाठी पाठवण्यात आलेल्या मुलासोबत लैंगिक शोषण करून त्याला अश्लिल मेसेस पाठवल्याचा आरोप होता. पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांच्याआधारे न्यायालयाने महिलेला दोन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे.

‘द सन’ च्या वृत्तानुसार अॅशले राईट असे त्या महिलेचे नाव आहे. पीडित मुलाला मिल्टन किन्स सिक्युअर ट्रेनिंग फॅसिलीटीसाठी पाठविण्यात आले होते. कस्टडी ऑफिसर अॅशले राईट तेच काम करत होती आणि याच काळात तिचा संपर्क पीडित मुलाशी आला. डिसेंबर 2018 ते जून 2019 दरम्यान तिनं त्या मुलाचं लैंगिक शोषण केलं. त्याला अश्लिल मेसेज पाठवले. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान पोलिसांना असे अनेक मेसेजेस मिळाले ज्यात अ‍ॅशले राईटने अश्लिल गोष्टी लिहिल्या होत्या. मुलाला पाठवलेल्या एका मेसेजमध्ये तिने मी तुझ्याबरोबर झोपण्यासाठी आणखी वाट पाहू शकत नाही. तर दुसर्‍या मेसेजमध्ये तिने ‘बेबे तू त्या फोटोमध्ये सेक्सी दिसत आहेस’. याबरोबरच अॅशले राईटने पीडित मुलाला काही अश्लील फोटोही पाठवले होते. क्राउन प्रॉसिक्युशन सर्व्हिसच्या प्रवक्त्यांनी हे फोटो घराच्या झडतीदरम्यान तिच्या बेडरूममधून सापडले. काही फोटो आरोपीच्या आयपॅड आणि मोबाईल फोनमध्येही सापडले असून ज्यात ती पीडित मुलासह दिसली आहे.

या खटल्याच्या सुनावणीदरम्यान किंग्स्टन क्राउन कोर्टाने अॅशले राईटवरील आरोप गंभीर आहेत, त्यामुळे तिला शिक्षा झाली पाहिजे. यासह न्यायालयाने अ‍ॅशलेला दोन वर्ष तुरूंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दहा वर्षांसाठी तिचे नाव लैंगिक गुन्हेगारांच्या यादीत ठेवण्याचे आदेशही दिले. याआधीही 13 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसह तिने लैंगिक छळ केल्याबाबत दोषी ठरविण्यात आले होते. तिच्या सवयींचा खुलासा तेव्हा झाला जेव्हा अन्य कर्मचार्‍यांनी तिला मुलाबरोबर आक्षेपार्ह कृत्य करताना पाहिलं.

आपली प्रतिक्रिया द्या