‘कोरोना लस तयार होणार नाही, ट्रम्प निवडणूक हरणार’, ‘या’ जोतिषाने केली भविष्यवाणी

कोरोना विषाणूबद्दल अचूक भाकीत सांगणार्‍या ब्रिटीश ज्योतिषीने पुन्हा यासंदर्भात एक नवीन भविष्यवाणी केली आहे. त्यांनी सांगितलं की, हा आजार ब्रिटनमध्ये किती काळ राहील आणि अमेरिकेच्या निवडणुकीत काय होईल. ‘मिरर डॉट’च्या वृत्तानुसार, ब्रिटीश ज्योतिषी जेसिका अ‍ॅडम्सने फेब्रुवारी 2019 मध्ये असा दावा केला होता की, एक व्हायरस संपूर्ण जग नष्ट करेल. त्यावेळी त्यांच्या या दाव्यावर कोणीही विश्वास ठेवला नव्हता.

‘कोरोना लस तयार होणार नाही, यासोबतच जगावं लागेल’

‘डेली मेल’शी बोलताना ज्योतिषी जेसिका अ‍ॅडम्सने यांनी दावा केला आहे की, 2020 पर्यंत ब्रिटनमध्ये कोरोना पूर्णपणे नाहीसा होणार. मात्र जगाला कोरोना विषाणूसोबतच जगावं लागणार आहे. त्या म्हणाल्या की, ‘कोरोनाची लस कधीच तयार होणार नाही, आपल्याला यासोबतच जगायची सवय करून घ्यायला हवी.’

‘अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष ट्रम्प नसणार’

अमेरिकेत होऊ घातलेल्या निवडणुकीवरूनही त्यांनी दावा केला आहे की, ‘तेथे गोष्टी सुरळीत होत नसून निवडणुका पुढे ढकलल्या जाऊ शकतात.’ त्या म्हणल्या, ‘अमेरिकेकडे एक नवीन नेता असेल. ही डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी चांगली बातमी नाही. ते अमेरिकेचे पुढील राष्ट्राध्यक्ष नसणार.’

आपली प्रतिक्रिया द्या