ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर खोदकामादरम्यान तोफा सापडल्या, मराठ्यांचा होता किल्ला

1345

नागपुरातील ऐतिहासिक कस्तुरचंद पार्क मैदानावर सुरु असलेल्या खोदकामादरम्यान चार भल्या मोठ्या तोफा सापडल्या आहेत. या तोफा 1817 दरम्यान झालेल्या इंग्रज-मराठा युद्धकाळातील असाव्यात असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला असून आणखी दारुगोळा सापडण्याचा अंदाज आहे.

सध्या कस्तुरचंद पार्क मैदानावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. त्याचेच खोदकाम सुरू असताना रात्री या तोफा जमिनीत चार फूट अंतरावर आढळून आल्या आहे. या चारही तोफा 10 फूट लांबीच्या असून त्याचा व्यास दोन ते तीन फुटांचा आहे. जाणकारांच्या अनुसार तोफा लांब पल्ल्याच्या असून त्या इंग्रज सैन्याच्या असव्यात, असा अंदाज आहे.

कस्तुरचंद पार्क मैदानाजवळ मराठ्याचा अर्थात भोसले घराण्याचा सीताबर्डी किल्ला होता. 1817 आणि 1818 मध्ये इंग्रज आणि मराठा युद्धाच्यावेळी घडामोडींचे प्रमुख केंद्र हाच सीताबर्डी किल्ला ठरला होता. आणि त्याच पायथ्याशी असलेल्या या कस्तुरचंद पार्क मैदानावर नंतरच्या काळात इंग्रजांचा बँड स्टँड म्हणजेच कवायतीचा तळही होता. त्यामुळे या तोफा त्याच काळातील असाव्यात असा अंदाज बांधला जात आहे. जमिनीतून ऐतिहासिक तोफा आढळल्याची बातमी पसरताच प्रशासकीय अधिकारी, पोलीस, सैन्य दलातील अधिकारी यांच्यासह बघ्यांची गर्दी परिसरात वाढली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या