ब्रिटिश राजवाड्याबाहेर उडू लागली विचित्र वस्तू, एलियनचे वाहन असल्याचा तज्ज्ञांनी केला दावा

जगातील अनेक देशांमध्ये एलियन्सची वाहने म्हणजेच अनआयडेंटिफाइड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स (यूएफओ) दिसल्याचा दावा करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांनी असे म्हटले होते की, एलियन येतात आणि त्यांच्या गायींचे कान आणि नाक कापून घेऊन जातात. एका पायलटने तर आकाशात यूएफओने पाठलाग केल्याचे सांगितले. आता तज्ज्ञ या घटनांची सत्यता पडताळून पाहात आहेत. याच दरम्यान ब्रिटनच्या राजघराण्याच्या घरात एलियन पोहोचल्याची बाब समोर आली आहे.

न्यूयॉर्क पोस्टमध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, ब्रिटिश राजघराण्यातील राजकुमार प्रिन्स हॅरी आणि त्यांची पत्नी मेघन मार्कल यांनी 2021 साली अमेरिकेतील लॉस एंजेलिस येथे एक आलिशान राजवाडा विकत घेतला होता. उन्हाळ्याच्या सुट्ट्या इथे आनंदात घालवता येतील, या उद्देशाने त्यांनी हा वाडा खरेदी केला होता. एकूण 18 हजार स्क्वेअर फूटमध्ये बांधलेल्या या राजभवनात 9 बेडरूम आणि 16 बाथरूम आहेत. अहवालानुसार, त्या काळी 14 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 1.15 अब्ज रुपये खर्च या राजवाड्याकरिता करण्यात आला होता. या हवेलीपासून काही अंतरावर एक गोलाकार उडती तबकडी दिसल्याचा दावा केला जात असून या तबकडीचे वर्णन एलियनचे वाहन असल्याचा उल्लेख केला जात आहे.

यूएफओ तज्ज्ञ टोनी मोरेना यांनीही गुगलद्वारे या फिरत्या तबकडीचे छायाचित्र काढले. प्रिन्स हॅरीच्या घरापासून ते 25 मैलांवर दिसल्याचे त्यांनी सांगितले. दुरून दिसणारी ही एक गूढ वस्तू होती, जी गोल होती. त्याची रुंदी सुमारे 8 मीटर असावी. त्याभोवती काहीतरी लिहिले होते. या तबकडीचे पृथ्वीपासूनचे अंतर इतके जास्त होते की तिला ओळखणे कठीण होतेच शिवाय त्यावरील भाषाही विचित्र होती. यामुळे तज्ज्ञ ही तबकडी UFO असल्याचा दावा करत आहेत, परंतु अद्याप याबाबत खात्री झालेली नाही.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिसेंबर 2018 ते नोव्हेंबर 2000 दरम्यान, अमेरिकेच्या या भागात 29 वेळा रहस्यमय उडणाऱ्या वस्तू पाहिल्याचा दावा करण्यात आला होता. 27 वर्षांत 800 हून अधिक अज्ञात उडत्या वस्तू पाहिल्याची माहिती संरक्षण विभागाला मिळाली होती. आता रोज कुठून ना कुठून अशी माहिती मिळत आहे. अमेरिकाही या घटनांकडे गांभीर्याने पाहात असून याबाबत चौकशी सुरू आहे.