दोनवेळचे जेवण मिळवण्यासाठी आमचे नग्न फोटो विकू, इंग्लंडमधल्या नागरिकांची धमकी

मंदी आणि महागाईचे संकट जगभर घोंघावतंय. इंग्लंडसारख्या महासत्ताही महागाईच्या तडाख्यातून सुटल्या नाहीयेत. बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर 1.25 टक्क्यांवरून 1.75 टक्के इतका होणार असल्याची आगाऊ सूचना दिली आहे. 2023 च्या शेवटापर्यंत मंदीचे संकट कायम राहील असा इशाराही देण्यात आला आहे. इंग्लंडमध्ये महागाईमुळे आधीच तिथली जनता त्रस्त आहे. इग्लंडचे पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांच्या विरूद्ध जनतेच्या मनात या महागाईमुळे मोठा रोष निर्माण झाला होता. या मंदी आणि महागाईची सुरुवात रशिया आणि युक्रेनमधील युद्धापासून झाली होती.

मंदी आणि महागाईचा मुकाबला करण्यासाठी उत्पन्नाची नवी साधने कोणती आहेत या बाबत ट्विटरवर चर्चा झडायला लागल्या आहेत. एका ट्विटर वापरणाऱ्याने ‘दोनवेळचं अन्न मिळावं यासाठी आम्ही आमचे नग्न फोटो विकून पैसे कमवायला सुरुवात करतो’ असं म्हटलं आहे.