बिहार : पूर-कोरोनाचा दरभंगात कहर, संतप्त जमावाने जेडीयू आमदाराला ठेवलं ओलिस

566
darbhanga

बिहारमधील पूर आणि कोरोनाचा कहर अशा कात्रीत तिथली जनता अडकली आहे. एकाच वेळी दोन संकटांना सामोरे जाणाऱ्या लोकांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. बिहारमध्ये निवडणुका तोंडावर असून नेत्यांविषयी लोकांमध्ये असलेला संतापही वाढत आहे. त्याचेच चित्र दरभंगात पाहायला मिळत आहे.

दरभंगाच्या कुशेश्वरस्थान परिसरातील ब्रह्मपूर पंचायतीच्या कटवार घाटात स्थानिक आमदार शशिभूषण हजारी यांना या भागातील लोकांनी अनेक तास ओलिस ठेवले. पोस्टर बॅनर लावून ‘घुसखोर आणि निक्कमा आमदार गो बॅक’ च्या घोषणा दिल्या.

याआधी देखील काही दिवसांपूर्वी आमदार शशिभूषण हजारी यांना जनतेच्या विरोधाचा सामना करावा लागला.

संतप्त लोक म्हणाले की गेली 10 वर्षे त्या भागाचे आमदार असूनही शशिभूषण हजारी यांनी कोणतेही काम केलेले नाही. लोक आमदारांना त्यांचे काम विचारत होते. बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत. निवडणुका लक्षात घेता नेत्यांनी या भागाचा दौरा केला आहे. बरीच मेहनत घेतल्यानंतर आमदार शशिभूषण हजारी यांना पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर येथील लोकांनी मुक्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या