बीड जिल्हा हादरला, सख्ख्या भावाने दगडाने ठेचून केली भावाची हत्या

5691

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यातील ममतापूर पाटोदा येथे सख्ख्या भावाने भावाची दगडाने ठेचून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. विलास मोहन यशवंत (50) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. ही घटना सायंकाळी सहा वाजता घडली.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ममदापुर पाटोदा येथे दोन सख्ख्या भावांमध्ये काही कारणास्तव भांडण झाले. हा एवढा विकोपाला गेला की एका भावाने दुसऱ्याच्या डोक्यात दगड घातला आणि त्याची हत्या केली. सायंकाळी ही घटना घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हत्येचा आणि दोघांमध्ये नक्की कोणत्या कारणामुळे वाद झाला याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. पोलीस तपास करत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या