एकाच मुलीच्या प्रेमात पडले सख्खे भाऊ, पुढे काय झालं वाचा

42

सामना ऑनलाईन, कानपूर

एक फूल दो माली टाईप गोष्टी आपण चित्रपटात अनेकदा बघितल्या आहेत. मात्र कानपूरमध्ये कल्पनेपलिकडचा प्रकार घडला. एकाच मुलीवर दोन सख्ख्या भावांचं प्रेम जडलं आणि त्यानंतर जे झालं ते फार भयानक होतं. दोघेही या मुलीवर वेड्यासारखं प्रेम करायला लागले होते. जेव्हा दोघांना आपण एकाच मुलीवर प्रेम करत असल्याचं कळालं तेव्हा दोघे कट्टर वैरी बनले.

या दोघांमधलं वैर इतकं वाढलं की दोघे एकमेकांशी बोलणं तर लांबच राहीलं तोंडही बघत नव्हते. दोघेही संतापाच्या आगीत जळत होते. अखेर यातल्या एका भावाने निर्णय घेतला आणि रविवारच्या दिवशी तो कोणालाही न सांगता घराबाहेर पडला. त्याने थेट रेल्वे ट्रॅक गाठला आणि भरधाव वेगात येणाऱ्या गाडीखाली उडी मारत आत्महत्या केली. याबाबत त्याच्या भावाला विचारलं असता त्याने सांगितलं की त्याचा भाऊ भडक डोक्याचा होता त्यामुळे त्याने हा निर्णय घेतला. मात्र पोलीस अजून त्याच्या सांगण्यावर विश्वास ठेवला नसून या प्रकारामागे काही घातपात आहे का हे तपासण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे.

आपली प्रतिक्रिया द्या