बांगलादेशात सुरु असलेल्या हिंसाचार दरम्यान आता तिथल्या नागरिकांचे हिंदुस्थानात घुसखोरीचे प्रमाण वाढले आहे. बीएसएफ जवानांनी रविवारी सीमेवर हिंदुस्थानात घुसण्याच्या प्रयत्नात असलेल्या 11 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. त्यांना बंगाल, मेघालय आणि त्रिपुराच्या सीमेवरुन अटक केली आहे. त्यामुळे आता सीमाभागात बीएसएफ सतर्क झाले आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, बीएसएफच्या एका प्रवक्त्याने सांगितले की, अटक केलेल्या लोकांची चौकशी केली जात आहे आणि पुढील तपासासाठी त्यांना त्या-त्या राज्याच्या पोलिसांकडे सोपविण्याची तयारी केली जात आहे. बीएसएफने बॉर्डर गार्ड्स बांगलादेश (बीजीबी)शी परस्पर समस्यांचे निराकरण करण्यासाठी, विशेषत: बांगलादेशातील हिंदुस्थानी नागरिक आणि अल्पसंख्याक समुदायातील लोकांवरील अत्याचार रोखण्यासाठी नियमित संपर्कात आहे.
11 बांगलादेशी नागरिकांना हिंदुस्थानच्या सीमेवर घुसखोरी करताना पकडण्यात आले आहे. यामध्ये दोन पश्चिम बंगाल, दोन त्रिपुरा आणि ,सात मेघालयच्या सीमेवर अटक केले आहे. पकडलेल्या लोकांची चौकशी सुरु आहे आणि पुढील कायदेशीर कारवाईसाठी राज्य पोलिसांकडे सोपविले जाईल.