हिंदुस्थानच्या सीमेवर आणखी एक भूयार सापडले; पाकड्यांचे नापाक इरादे उघड

जम्मू कश्मीरमध्ये सुरक्षा दलाला मोठे यश मिळाले आहे. दहशतवाद्यांच्या घुसखोरी करता यावी यासाठी पाकड्यांनी आखलेला कट सुरक्षा दलाने उधळून लावला आहे. शनिवारी गस्तीवर असलेल्या बीएसएफच्या जवानांना हीरानगर पानसर भागात एक भूयार सापडले आहे. हे भूयार 150 मीटर लांब आणि 30 फूट रुंद आहे. दहशतवाद्यांना घुसखोरी करता यावी, यासाठी हे भूयार तयार करण्यात येत असल्याचा संशय आहे.

सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) जवान हीरानगर पानसर भागात गस्त घालत होते. त्यावेळी जवानांना हे भूयार आढळले आहे. हे भूयार पानसर भागातील बीपी नंबर 14 ते 15 दरम्यान आहे. दहशतवादी घातपाती कारवाया करण्यासाठी हिंदुस्थानात घुसखोरी करतात. त्यासाठी त्यांना कव्हरिंग फायरिंग देण्यासाठी पाकिस्तानकडून शस्त्रसंधींचे उल्लंघन करत गोळीबार केला जातो.

सीमेवर जवान सतर्क असल्याने दहशतवाद्यांचे घुसखोरीचे कट सुरक्षा दल हाणून पाडत आहे. त्यामुळे पाकड्यांनी आता भूयार तयार करत दहशवाद्यांच्या घुसखोरीचे प्रयत्न सुरू केले आहेत. जम्मू कश्मीरमध्ये गेल्या सहा महिन्यात सांबा, हीरानगर, कठुआ या भागात आढळलेले हे चौथे भूयार आहे. तर जम्मूमध्ये आढळलेले हे 10 वे भूयार आहे. गेल्या 10 दिवसात आढळलेले हे दुसरे भूयार आहे. सुरक्षा दल या भूयारांबाबत अधिक तपास करत आहे.

या भागात पाकड्यांनी घुसखोरीसाठी भूयार बनवल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार अँटी टनलिंग ड्राइव्हदरम्यान गस्तीवर असलेल्या जवानांना हे भूयार आढळले आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. घुसखोरीसाठी अशी भूयारे शोधण्यासाठी पाकिस्तान अभियंत्यांची मदत घेत आहे. त्यामुळे शेकडो मीटर लांबीचे भूयार यातार होत असतानाही याची माहिती मिळणे कठीण असल्याचे सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, अँटी टनलिंग मोहिमेव्दारे सुरक्षा दलाने गेल्या सहा महिन्यात 10 भूयारे शोधण्यात यश मिळवले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या