बीएसएफ अधिकाऱ्याला कोरोनाची बाधा, 50 जवान क्वारंटाईन

1347
प्रातिनिधीक फोटो

मध्य प्रदेश येथे सीमा सुरक्षा दलाचा अधिकारी कोरोनाबाधित असल्याचं आढळल्याने खळबळ माजली आहे. त्यामुळे या अधिकाऱ्याच्या संपर्कात येणाऱ्या 50 बीएसएफ जवानांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे.

आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, मध्य प्रदेश येथील ग्वाल्हेर जिल्ह्यात टेकनपूर येथे बीएसएफचे एक अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रावरील 57 वर्षीय अधिकारी कोरोनाबाधित असल्याचं आढळलं आहे. या अधिकाऱ्याने 15 मार्च ते 19 मार्च दरम्यान एडीजी, आयजी रँकिंग असलेल्या अधिकाऱ्यांसमवेत काही बैठकींमध्ये सहभाग घेतला होता. त्यानंतर त्याला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.

या अधिकाऱ्याची पत्नी काही काळापूर्वी लंडन येथून परतली होती. त्यामुळे या अधिकाऱ्याला पत्नीमुळेच कोरोनाची बाधा झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळताच त्याच्या संपर्कात आलेल्या 50 बीएसएफ जवान आणि अधिकाऱ्यांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे. यापूर्वी शनिवारी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या एका जवानाला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं होतं. हा जवान मुंबई विमानतळावर कार्यरत आहे. आपल्या कर्तव्यावर असताना त्याला कोरोनाची लागण झाल्याचा अंजाज वर्तवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या