‘बीएसएनएल’मध्ये अडीच हजार ज्युनियर इंजिनीयर्सची भरती होणार!

22

नवी दिल्ली – भारत संचार निगम लिमिटेड अर्थात ‘बीएसएनएल’मध्ये देशात खुल्या पद्धतीने दोन हजार ५१० पदवीधर इंजिनीयर्सची कनिष्ठ दूरसंचार ऑफिसर, दूरसंचार (ज्युनियर टेलिकॉम ऑफिसर – टेलिकॉम) या पदावर भरती करण्यात येणार आहे. या पदाच्या भरतीसाठी येत्या सहा मार्चपासून ऑनलाइन ऑप्लिकेशन करता येणार आहेत. अर्ज भरण्याची ही प्रक्रिया सहा एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.

या भरतीसाठी वैध गेट स्कोअर २०१७ च्या धर्तीवर उमेदवारांची निवड होणार आहे. याव्यतिरिक्त बीएसएनएल कोणतीही परीक्षा, मुलाखती घेणार नाही असे स्पष्ट केले आहे.

ज्युनिअर टेलिकॉम ऑफिसर – टेलिकॉम अर्थात जीटीओ (टी) हे सर्कल विभागनिहाय कर्मचारीपद असून ज्या विभागात जेवढी पदे रिक्त आहेत तेवढी पदे भरण्यात येणार आहेत. इच्छुक उमेदवारांनी बीएसएनएल एक्स्टर्नल एक्झाम वेबसाइट पाहावी असे स्पष्ट करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात ४४० जागांसाठी भरती

या पदासाठी महाराष्ट्रात एकूण ४४० पदे रिक्त आहेत. एवढय़ाच पदासाठी राज्यात भरती होईल. या ४४० मधील २२२ पदे खुले गट, ११९ पदे  इतर मागासवर्गांय (ओबीसी), ६६ मागासवर्गीय (एससी), ३३ अनुसूचित जाती (एसटी) तर १३ जागा या पीडब्ल्यूडीसाठी राखीव आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या