निकालानंतर बसपा भाजपसोबत युती करणार, काँग्रेस नेत्याचा खळबळजनक दावा

34

सामना ऑनलाईन । लखनौ

लोकसभा निवडणूकीच्या प्रचारात बसपा अध्यक्ष मायावती यांनी भाजपवर व पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली आहे. मात्र याच मायावती लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर भाजपसोबत हातमिळवणी करणार असल्याचा खळबळजनक दावा बसपाचे माजी नेते नसिमुद्दीन सिद्दीकी यांनी केला आहे. त्यांच्या दाव्यामुळे आता मायावती यांची निकालानंतर भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. टाईम्स नाऊने याबाबत वृत्त दिले आहे.

नसिमुद्दीन हे मायावती यांच्या जवळच्या नेत्यांपैकी एक मानले जायचे. ते जवळपास 33 वर्षे मायावती यांच्यासोबत होते. मात्र गेल्या वर्षी त्यांनी बसपाला राम राम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. बसपा व भाजच्या युतीविषयी बोलताना नसिमुद्दीन म्हणाले, ‘मी मायावती यांना त्यांच्या स्वत:पेक्षा जास्त चांगले ओळखतो. राजकारणात काहीही अशक्य नाही. मायावती यांनी याआधीही भाजपशी हातमिळवणी केली आहे. 23 मे ला निकालानंतर त्यांच्यावर अशा प्रकारे दबाव निर्माण करण्यात येईल की त्या स्वत: महागठबंधनला फाट्यावर मारून भाजपसोबत जातील. त्यानंतर समाजवादी पार्टीला देखील काँग्रेससोबत युती करावी लागेल’,

आपली प्रतिक्रिया द्या