Live – ५ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावरील आयकर कमी करून ५ टक्के केला

54

३ ते ३.५ लाख उत्पन्न असणाऱ्यांना २५०० रूपये आयकर

……………………………………………….

३ लाखांपर्यंतचं उत्पन्न आयकरमुक्त केलं

……………………………………………….

५ लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना ५ टक्के आयकर (आधी १० टक्के आयकर भरावा लागत होता)

……………………………………………….

राजकीय पक्षांना आयकर भरावाच लागेल

……………………………………………….

राजकीय पक्ष बॉन्डस जारी करून त्याच्या माध्यमातून निधी उभारू शकतात, हे बॉन्ड वैध मार्गाने म्हणजेच डिजिटल पेमेंट,चेकच्या माध्यमातून खरेदी करता येऊ शकतील

……………………………………………….

२ हजार रूपयांपर्यतचीच रक्कम राजकीय पक्ष रोखीने स्वीकारू शकतात

……………………………………………….

३ लाखांच्या वरचे व्यवहार रोखीने करता येणार नाही

……………………………………………….

भूमी अधिग्रहण मोबदला करमुक्त असेल

……………………………………………….

५० कोटींपर्यंत उत्पन्न असलेल्या मध्यम आणि लघु अद्योग कंपन्यांचा आयकर ५ टक्क्यांनी कमी केला

……………………………………………….

मध्यमवर्गींयांना करसवलत दिली जाणार

……………………………………………….

कर बुडवणाऱ्यांमुळे प्रामिणिक करदात्यांवर नाहक बोजा पडतो

……………………………………………….

२० लाख व्यापाऱ्यांनीच ५ लाख उत्पन्न दाखवलं

……………………………………………….

९९ लाख लोकांनी २.५ लाखांपेक्षा कमी उत्पन्न दाखवलं

……………………………………………….

५२ लाख लोकांनी ५-१० लाख उत्पन्न दाखवलं

……………………………………………….

१.७२ लाख लोकांनी ५० लाखांपेक्षा जास्त उत्पन्न दाखवलं

……………………………………………….

अरूण जेटली यांची करांसंदर्भात निवेदन करायला सुरूवात

……………………………………………….

३ वर्षांसाठी ३ टक्के वित्तीय तुटीचं लक्ष

……………………………………………….

सैनिकांंसाठी एक नवी प्रणाली बनवणार ज्यामुळे त्यांना तिकीटासाठी रांगेत उभं रहावं लागणार नाही

……………………………………………….

मुख्य पोस्ट ऑफीसातही पासपोर्ट काढता येणार

……………………………………………….

घोटाळेबाज,कर्जबाजारी देशाबाहेर पळून जात होते, त्यांची मालमत्ता ताबडतोब जप्त होणार

……………………………………………….

भीम अॅपचा वापर वाढावा म्हणून रेफरल बोनस आणि कॅशबॅक सुविधा सुरू करणार

……………………………………………….

सप्टेंबर २०१७ पर्यंत आधारकार्डचा वापर करून पैशांचे व्यवहार करता येऊ शकतील अशी २० लाख POS मशीन आणणार

……………………………………………….

आधार कार्डचा वापर करून पैश्यांचे व्यवहार सुरू करणार

……………………………………………….

IRCTC ची कंपनी म्हणून शेअर बाजारात नोंदणी होणार

……………………………………………….

विदेशी गुंतवणूकदारांसाठी नवी ऑनलाईन व्यवस्था सुरू केली जाणार

……………………………………………….

विदेशी गुंतवणुकीला मंजुरी देणारी FIPB ही संस्था बंद करण्यात येणार

……………………………………………….

पायाभूत सुविधांच्या विकासासाठी ३ लाख ९६ हजार कोटींची तरतूद

……………………………………………….

नवे मेट्रो धोरण आणणार

……………………………………………….

कोच मित्र सेवेची सुरूवात करणार

……………………………………………….

२०१९ पर्यंत सगळ्या गाड्यामध्ये बायोटॉयलेट लावणार

……………………………………………….

आयआरसीटीसीच्या माध्यमातून ई-तिकीट काढणाऱ्यांना सर्व्हीस चार्ज द्यावा लागणार नाही

……………………………………………….

२००० रेल्वे स्थानकं सौरउर्जेच्या माध्यमातून उर्जा स्वयंपूर्ण करण्याचं उद्दीष्ट

……………………………………………….

२५ रेल्वे स्थानकांचा कायापलट करणार

……………………………………………….

पर्यटन आणि तीर्थाटनासाठी विशेष रेल्वेगाड्या सुरू करण्याचा प्रयत्न

……………………………………………….

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी १ लाख ३१ हजार कोटींची तरतूद

……………………………………………….

ज्येष्ठ नागरिकांना आधारकार्ड आधारीत हेल्थ कार्ड देणार

……………………………………………….

परवडणाऱ्या घरांच्या निर्माणाच्या कामाला पायाभूत सुविधेचा दर्जा देणार

……………………………………………….

वरिष्ठ नागरीकांसाठी आधार कार्ड

……………………………………………….

एस,एसटी,अल्पसंख्याकांच्या विकासासाठी जास्त तरतूद

……………………………………………….

२०२५पर्यंत टीबीचा नायनाट करणार

……………………………………………….

गुजरात आणि झारखंडमध्ये २ एम्स रूग्णालये उभी राहणार

……………………………………………….

राष्ट्रीय परीक्षा संस्था बनवण्यात येणार

……………………………………………….

सीबीएसई AICTE साठी प्रवेश परीक्षा नसेल

……………………………………………….

तरूणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयंम योजना सुरू करणार

……………………………………………….

६०० जिल्ह्यांमध्ये कौशल्य केंद्र सुरू करणार

……………………………………………….

ग्रामीण भागाच्या विकासासाठी १.८७ लाख कोटी रूपयांची तरतूद

……………………………………………….

ग्रामीण भागातील विद्युतीकरणासाठी ४५०० कोटी देणार

……………………………………………….

३ वर्षात नाबार्डला १९०० कोटी रूपये देणार

……………………………………………….

२०१९पर्यंत १ कोटी नागरीक गरीबीरेषेच्या वर येतील

……………………………………………….

बेघर आणि कच्च्या घरांमध्ये राहाणाऱ्यांसाठी १ कोटी घरं २०१९ च्या शेवटापर्यंत उभी करणार

……………………………………………….

दुग्धविकासासाठी ८ हजार कोटींची तरतूद

……………………………………………….

मनरेगासाठी ४८ हजार कोटींची तरतूद

……………………………………………….

५ लाख शेततळ्यांचं उद्धीष्ट होतं जे पूर्ण झालं आहे,१० लाख शेततळ्यांचे उद्दीष्ट मार्च महिन्यात गाठू

……………………………………………….

कृषी विमा आता ३० टक्क्यांऐवजी ४० टक्के

……………………………………………….

२०१७-२०१८ साठी कृषी विकास दर ४.१ टक्के राहील अशी अपेक्षा

……………………………………………….

अर्थमंत्री जेटली उभं न राहता बसून अर्थसंकल्प वाचत आहेत

……………………………………………….

दीर्घकाळ सिंचन योजनांसाठी ४० हजार कोटींची तरतूद

……………………………………………….

शेतकऱ्यांना १० लाख कोटींचं कर्ज उपलब्ध करून दिलं

……………………………………………….

टेक (TEC)इंडीया हा सरकारचा पुढचा कार्यक्रम

……………………………………………….

ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी प्रयत्न करणार

……………………………………………….

गेल्या वर्षीच्या तुलनेत खरीप आणि रब्बीचं पेरणी क्षेत्र वाढलंय

……………………………………………….

शेतकऱ्यांचे उत्पन्न ५ वर्षात दुप्पट करण्याचा प्रयत्न

……………………………………………….

महागाईचा दर ६ टक्क्यांपेक्षा कमी आहे

……………………………………………….

रेल्वे अर्थसंकल्प रद्द करणे ऐतिहासिक निर्णय

……………………………………………….

अर्थसंकल्पाच्या तारखेत बदल केला, आर्थिक वर्षाच्या सुरूवातीपासून योजनांच्या अंमलबजावणीस मदत होईल

……………………………………………….

वित्तीय तूट कमी झाली

……………………………………………….

ग्रामीण भागासाठी अर्थसंकल्पात जास्त तरतूद

……………………………………………….

नोटाबंदीचा निर्णय ऐतिहासिक निर्णय

……………………………………………….

जीएसटीमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळेल

……………………………………………….

महागाईवर नियंत्रण मिळवण्याचे सरकारने प्रयत्न केले

……………………………………………….

कच्च्या तेलाच्या किंमती आणि पेट्रोलच्या किंमती कमी होण्याची शक्यता-जेटली

……………………………………………….

अरूण जेटली यांचे भाषण सुरू झाले

……………………………………………….

ई-अहमद यांच्या निधनाने दु:ख झाले, मात्र अर्थसंकल्प आज सादर होणार: सुमित्रा महाजन

……………………………………………….

अर्थसंकल्पासंदर्भातील सर्व तयारी झाली असल्याने अर्थसंकल्प पुढे ढकलणे शक्य नाही, यावर कोणताही वाद उभा करू नये, हे घटनात्मक बंधन आहे: व्यकैया नायडू

……………………………………………….

केंद्रीय मंत्रिमंडळाची अर्थसंकल्पाला मंजूरी

……………………………………………….

संसदेच्या सदस्याचे निधन झाल्यास संसदचे कामकाज तहकूब करणे ही परंपरा आहे, मात्र हे सरकार परंपरा पाळत नाही; समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांची टीका

……………………………………………….

पंतप्रधान नरेंद्र मोदी ई-अहमद यांच्या घरी पोहोचले

……………………………………………….

mallikarjun-khadge

केंद्र सरकारने उचललेले पाऊल म्हणजे अमानवीय कृत्य आहे, ३१ मार्च अजून बरीच दूर असून अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलणे सहज शक्य होते: मल्लिकार्जुन खडगे

……………………………………………….

जेडीयू नेते, माजी पंतप्रधान देवेगौडा आणि आमच्या मतानुसार अर्थसंकल्पाची तारीख पुढे ढकलणे आवश्यक होते : मल्लिकार्जुन खडगे

……………………………………………….

थोड्याच वेळात संसदेत केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक

……………………………………………….

budget-copy

 

……………………………………………….

अर्थसंकल्प आजच सादर करता यावा म्हणून केंद्र सरकारने सर्व पक्षांशी चर्चा केली आणि निर्णय घेतला: सूत्रांची माहिती

……………………………………………….

अर्थसंकल्पाची कागदपत्रे संपूर्ण सुरक्षेत संसदेत पोहोचली

……………………………………………….

jaitley-with-budget-bag

अर्थमंत्रालयातील सदस्यांसह केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली

……………………………………………….

अर्थसंकल्प आजच सादर होणार, अर्थमंत्री राष्ट्रपती भवनाकडे रवाना…

……………………………………………….

माजी मंत्री ई-अहमद यांच्या निधन, अर्थसंकल्प सादर करण्याचा निर्णय लोकसभा अध्यक्षा घेणार

आपली प्रतिक्रिया द्या