आरोग्य क्षेत्रासाठी अतिशय आशादायक अर्थसंकल्प!

2426

सामना ऑनलाईन । मुंबई

केंद्रीय अर्थमंत्री अर्थमंत्री जेटली यांनी २०१८-१९ साठी सादर केलेला अर्थसंकल्प आरोग्य क्षेत्रासाठी दिलासा देणारा असाच आहे, असे झेन हाँस्पिटलचे मेडीकल डायरेक्टर तसेच पोटविकार तज्ञ डाॅ. राॅय पाटणकर यांनी म्हटले आहे.

अर्थसंकल्पात १० कोटी जनतेला ५ लाखापर्यंत आरोग्य विमा कवच मिळणार आहे. तसेच मोफत आरोग्य तपासणीवर अधिक भर असून वेळीच आजाराचे निदान करण्यावर अधिक भर असणार आहे. क्षयरोगाच्या रूग्णांसाठी काँपर्स फंडच्या माध्यमातून दरमहा ५०० रूपये आहारासाठी देणार असल्याचं सांगितले आहे. तसेच, सरकारी रूग्णालयाची दुरूस्ती व २४ नवीन रूग्णालयं सुरू करणार असल्याची घोषणाही करण्यात आली. ३ लोकसभा मतदार संघ मिळून एक वैद्यकिय महाविद्यालय सुरू करणार असल्याने वैद्यकिय व बिना वैद्यकिय शिक्षणाचा कक्षा रूंदावल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या