
2023-24 चा अर्थसंकल्प मांडताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची जीभ घसरली. त्या चुकून पोल्यूशनच्या जागी पोलिटिकल बोलल्या. यानंतर सभागृहात हशा पिकला. हे संपूर्ण प्रकरण नितीन गडकरी यांच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाशी संबंधित होते. मात्र, सीतारामन यांनी लवकरच आपली चूक सुधारली. सॉरी म्हणत त्यांनी आपला मुद्दा स्पष्ट केला.
त्या प्रदूषणे करणाऱ्या वाहने हटवण्याविषयी बोलत असताना त्यांची जीभ घसरली. भाषणादरम्यान त्या म्हणाल्या-जुन्या वाहनांना बदलणे हे देशाचे जुने धोरण आहे. जुन्या राजकीय सॉरी… एवढे त्या बोलल्या आणि इतक्यात सभागृहात हशा पिकला. यावर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी अर्थमंत्र्यांना काही सांगितल्यावर त्या म्हणाल्या, मला माहीत आहे.
तर दुसरीकडे हे ऐकून केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही मोठ्याने हसत होते. यानंतर निर्मला यांनी सर्वांचे आभार मानले. आपले म्हणणे पुढे नेत अर्थमंत्री म्हणाल्या की, सर्व जुनी प्रदूषणे करणारी वाहने काढून टाकणे हा आपल्या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहे. यापूर्वी, केंद्रीय अर्थसंकल्प 2023-24 सादर करताना, निर्मला सीतारामन म्हणाल्या की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था योग्य मार्गावर आहे.
त्या म्हणाले की, त्यांच्या सरकारच्या नऊ वर्षांमध्ये दरडोई उत्पन्न दुप्पट होऊन 1.97 लाख रुपये झाले आहे. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, जगातील इतर मोठ्या देशांच्या तुलनेत हिंदुस्थानचा विकास चालू वर्षात 7 टक्के दराने होईल असा अंदाज आहे.