पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देणारा अर्थसंकल्प

51

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

आर्थिक वर्ष २०१७-१८ साठी अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी देशातील पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी विक्रमी तरतूद केली आहे. देशाची अर्थव्यवस्था गतीमान करण्यासाठी पायाभूत सुविधांचा विकास वेगाने होणे गरजेचे असते.

अर्थमंत्री जेटली यांनी पुढील आर्थिक वर्षात पायाभूत सुविधासाठी केलेली निधीची तरतूद आणि विविध योजना अशा आहेत.

  • पायाभूत सुविधांसाठी अर्थसंकल्पात ३ लाख ९६ हजार १३५ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद केली आहे.
  • ग्रामीण, कृषी आणि इतर क्षेत्रांसाठी पुढील आर्थिक वर्षासाठी (२०१७-१८) १ लाख ८७ हजार २२३ कोटी रुपयांच्या निधीची विक्रमी तरतूद करण्यात आली आहे.
  • रेल्वेच्या भांडवली आणि विकास खर्चासाठी २०१७-१८ साठी १.३१ लाख कोटी रुपयांची तरतूद केली असून त्यात सरकारच्या ५५ हजार कोटी रुपयांच्या निधीचा समावेश आहे.
  • देशातील राष्ट्रीय महामार्गाच्या विकासासाठी ६४ हजार कोटी रुपये निधी देऊ केला आहे.
  • ग्रामीण भागातील जनतेचे उत्पन्न दरवर्षी ५० हजार कोटी रुपये इतके व्हावे म्हणून दुग्ध उद्योगासाठी पायाभूत निधी उभारण्यात येणार आहे.
  • कच्च्या घरात राहणाऱ्या तसेच बेघर असलेल्यांसाठी २०१९ पर्यत एक कोटी घरे बांधण्याचा सरकारचा संकल्प आहे.
  • वाहतूक क्षेत्रासाठी २.४१ लाख कोटी रुपये आणि भारत नेट प्रोजेक्टसाठी १० हजार कोटीरुपयांच्या निधीची तरतूद केली आहे.
  • २०१७-१८ या वर्षात ३५०० किलोमीटर लांबीचे रेल्वेमार्ग कार्यान्वित करण्याची सरकारची योजना आहे.
  • नवे मेट्रो रेल्वे धोरण सरकार लवकरच जाहिर करणार असून त्यातून हजारो युवकांना रोजगार मिळू शकतील.
  • निर्यात वाढीसाठी व्यापार पायाभूत निर्यात योजना २०१७१८ सालात सुरु करण्यात येणार आहे.
आपली प्रतिक्रिया द्या