10 हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळताहेत ‘हे’ पाच दमदार स्मार्टफोन, जाणून घ्या

19329

लॉकडाऊन आणि कोरोना काळात तुम्ही नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक पर्याय आहेत. मात्र या काळात अनेक जण ‘हातचे राखून’ खर्च करत असून तुम्हीही खूप महागडा स्मार्टफोन न घेता कमी बजेटमध्ये दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर 10 हजारांपेक्षा कमी किमतीत अनेक ‘बेस्ट स्मार्टफोन’ बाजारात उपलब्ध आहेत. जाणून घेऊया…

1. रियलमी सी 3

images-1
रियलमी सी 3 हा स्मार्टफोन बाजारात 10 हजारांहून कमी किंमतीत उपलब्ध आहे. या फोनची किंमत 8000 रुपये इतकी आहे. 6.20 इंचाचा डिस्प्ले, MediaTek Helio P70 प्रोसेसर, 13 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा, 13+2 मेगापिक्सल रियर कॅमेरा, 4230mAh बॅटरी, Android Pie, 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज असे या फोनचे फीचर्स आहेत.

2. सॅमसंग गॅलेक्सी एम10

images-2
Samsung Galaxy M10 आता केवळ 10 हजार रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. 6.20 इंची डिस्प्ले, Exynos 7870 प्रोसेसर सह 2 जीबी रॅम आणि 16 जीबी स्टोरेज व 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज अशा व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 2 जीबी रॅमच्या फोनची किंमत 6 हजार 999 आणि 3 जीबी रॅमच्या फोनची किंमत 8 हजार 690 रुपये आहे.

3. रेडमी 6 प्रो

images-3
शाओमी कंपनीचा हा बजेट फोन आहे. यात 5.84 इंचाचा डिस्प्ले, स्नैपड्रॅगन 625 प्रोसेसर असून 12 आणि 5 मेगापिक्सलचे रियर कॅमेरे आणि 5 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 4,000 mAh दमदार बॅटरी असून 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या या फोनची किंमत 9 हजार 999 रुपये आहे.

4. सॅमसंग गॅलेक्सी ए10

images-4
Samsung Galaxy A10  2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजसह उपलब्ध आहे. यात 6.20 इंचाचा डिस्प्ले,
3,400 mAh ची बॅटरी, 13 मेगापिक्सल रियर आणि 5 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. काळ्या आणि निळ्या रंगातील या फोनची किंमत 7 हजार 9990 रुपये आहे.

5. रेडमी नोट 7

images-5
शाओमी कंपनीचा हा आणखी एक बजेट फोन असून यात 6.30 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले, क्वॉलकॉम 660 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज अशा दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. यात 4000mAh ची बॅटरी देण्यात आली असून 12 आणि 2 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा व 13 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. 3 जीबी व्हेरिएंटची किंमत 8 हजार 999 रुपये आहे.

सॅमसंगचे हे 5 दमदार स्मार्टफोन 4 ते 7 हजार रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या

आपली प्रतिक्रिया द्या