चिखली अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी सतीश गुप्त बिनविरोध

1147

चिखली अर्बन बँकेच्या अध्यक्षपदी सतीश गुप्त यांची बिनविरोध निवड आज करण्यात आली आहे. विदर्भातील अग्रगण्य बँक म्हणून नावारूपाला आलेली चिखली अर्बन बँकेच्या निवडणुकीमध्ये संचालक मंडळाची निवड बिनविरोध झाली आहे. यामध्ये सतीशभाऊ गुप्त, शेषराव शेळके, पुरुषोत्तम दिवटे, विश्वनाथ जितकर, मनोहरराव खडके, डॉ. गणेश मांटे, राजेंद्र शेटे, जीवन सपकाळे, सुनीताताई भालेराव, मंजूताई कोठारी, श्यामसुंदर पारिक, डॉ. राजेंद्र भाला, सुधाकरराव कुलकर्णी, शैलेश बाहेती व सुशील शेटे हे बिनविरोध निवडून आले आहे. आज दिनांक १२ फेब्रुवारीला झालेल्या सभेत बँकेचे अध्यक्ष म्हणून सतीश गुप्त यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी शेषराव शेळके यांची निवड सर्वांनुमते करण्यात आली. या निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जालना जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, जालना जिल्हा उपनिबंधक वरखेडे, सहाय्यक उपनिबंधक कृपलानी, मलकापूर सहाय्यक उपनिबंधक चौधरी यांनी कार्य पाहिले. बँकेचे अध्यक्ष म्हणून सतीश गुप्त तर उपाध्यक्षपदी शेषराव शेळके यांची निवड झाल्याबद्दल समस्त नवनिर्वाचित संचालक मंडळावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या