बुलढाणा – एकाच रात्रीत आढळले 8 कोरोना पॉझिटिव्ह

1185

बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा येथे 1 कोरोना ऑफ पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर मध्यरात्री उशिरा आलेल्या रिपोर्टनुसार, जी माहिती मिळाली, त्यात मलकापूर शहरात 4, धरणगाव येथे 1 व शेलापूर खुर्द येथील 2 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे कळते.

मिळालेल्या माहितीनुसार, मोताळा तालुक्यातील शेलापूर खुर्द येथील ‘त्या’ दोन व्यक्ती येरळी येथील ‘त्या’ रुग्णाच्या हायरिस्क संपर्कातील असल्यामुळे दोन दिवसापूर्वीच बुलढाणा येथे त्यांना कोविड रुग्णालयात हलवून, त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट प्राप्त झाला असून, ते पॉझिटिव्ह निघाले आहेत. दरम्यान साखरखेर्डा येथून कोरोना पॉझिटिव्ह निघालेल्या व्यक्तीच्या हायरिस्क संपर्कातील 19 जणांना रात्रीच तातडीने बुलढाणा येथे तपासणीसाठी आणण्यात आले असल्याची माहिती आहे.

आपली प्रतिक्रिया द्या