आईविना पोरक्या झालेल्या त्या चिमुकल्याला अखेर बाल कल्याण समितीने ताब्यात घेतले

666

बुलढाणा सामान्य रूग्णालयात उपचार घेणाऱ्या महिलेचे निधन झाल्यानंतर तिच्या चार वर्षाच्या मुलाला बाप, मामा, मावशी आहेत. मात्र या कोणीही दोन महिन्यात या मुलाकडे न बघितल्याने त्याचा सांभाळ करणाऱ्या आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या मुकाला शेवटी मावशीच्या ताब्यात दिले होते. मात्र जिल्हा महिला व बालविकास विभागाने 15 जुलैला या मुलाला सैलानी येथून ताब्यात घेत बाल कल्याण समितीच्या आदेशाने सध्या दत्तक गृहात ठेवले आहे.

जिल्ह्यातील सैलानी येथील एक महिला दोन महिन्यापूर्वी जिल्हा सामान्य रूग्णालयात तिच्या भावाने उपचारासाठी दाखल केली व निघून गेला. या महिले सोबत होता तो तिचा चार वर्षाचा चिमुकला. या चिमुकल्याची काळजी व त्याच्या आईवर उपचार आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केले. दुर्दैवाने आईचा 10 जुलै ला मृत्यू झाला.

दोन महिन्यात या महिलेला भेटायला कोणीच न आल्याने आरोग्य विभागाने अंत्यसंस्कार केले. आई गेल्यावर हा चिमुकला खूप रडला तेव्हा मायेचा आधार याच आरोग्य विभागाने दिला. तर या बाळाची मावशी सांभाळ करते म्हणून त्याला नंतर सैलानीला घेऊन गेली. मात्र 15 जुलैला बाल कल्याण समितीच्या परवानगीने  जि.प.उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरविंद रामरामे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी दिवेश मराठे, कक्ष समुपदेशक शारदा पवार, पत्रकार मयुर निकम, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप सपकाळ हे सर्व रायपूर पोलिसांच्या मदतीने सैलानी येथे गेले. सर्व चौकशी करून हे प्रकरण बाल कल्याण समितीच्या अँड किरण राठोड व आशा सौभागे यांच्या समितीसमोर ठेवले असता समितीने सदर चार वर्षाच्या मुकास दत्तक गृहात ठेवण्याचे आदेश दिले. त्यामुळे सध्या तरी हे बालक बाल कल्याण समितीच्या ताब्यात असुन भविष्यात याचा चांगल्या प्रकारे सांभाळ करणारा भेटल्यास समिती निर्णय घेईल.

आपली प्रतिक्रिया द्या