अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन वेश्याव्यवसायास केले प्रवृत्त; दाम्पत्याला अटक

crime

मॉलमध्ये चांगल्या पगाराची नोकरीसह पैशाचे आमिष दाखवत देहविक्री करण्यासाठी बुलढाणा येथून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पुणे ग्रामिण परिसरात बळजबरीने वेश्याव्यावसाय करून घेतल्याप्रकरणी एका दाम्पत्याला हडपसर पोलिसांनी अटक केली. दिलीप सखाराम पवार व त्याची पत्नी अशी अटकेल्यांची नावे आहेत. दोघांच्या विरुद्ध बुलढाना ग्रामिण पोलिस ठाण्यात मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी संबंधित दाम्पत्यांची नातेवाईक असून, दोघांनी पैसे कमविण्याच्या उद्देशाने तिला जबरदस्तीने बुलढाण्यातून पुण्यात आणून वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले. आरोपी महिला ही शहरातील एका नामांकित मॉलमध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करत होती. तर तिचा पती बांधकाम व्यावसायावर काम करतो. त्यांनी पिडीत मुलीला चांगली नोकरी लावत, असे म्हणत पुण्यात घेऊन जात असल्याचे कुटूंबियांना सांगितले. मात्र, दाम्पत्याबद्दल मुलीच्या कुटूंबियांना माहिती असल्यामुळे त्यांनी मुलीला पाठविण्यास नकार दिला होता. तरी देखील आरोपींनी पिडीत मुलीला प्रलोभन दाखवत घरच्यांच्या परस्पर पुण्यात आणले. त्यानंतर तिला वेश्याव्यवसास प्रवृत्त केले होते. हडपसर पोलिसांनी तीन दिवसरात्र ग्रामिण परिसर पालथा घालून दाम्पत्याच्या मुसक्या आवळल्या.

आपली प्रतिक्रिया द्या