बुलढाणा – महिला पोलीस कर्मचार्‍याचे अंघोळ करतानाचे फोटो व्हायरल, पोलीस दलात खळबळ

बुलढाणा जिल्हा पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका महिला पोलीस कर्मचारीचे चक्क प्रायव्हेट फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यामुळे जिल्हा पोलीस दलात एकच खळबळ उघडली आहे. या प्रकरणी पीडित महिला पोलीस कर्मचार्‍याने दिलेल्या तक्रारीवरुन बुलढाणा शहर पोलीस ठाण्यामध्ये विनयभंगासह आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस दलात कार्यरत एका महिला कर्मचाऱ्याचे अंघोळ करतानाचे प्रायव्हेट फोटो तिच्या ईमेल आयडीवर सेव्ह होते. हा इमेल आयडी हॅक करुन जवळपास 30 प्रायव्हेट फोटो पीडित महिला पोलीस कर्मचार्‍याच्या मोबाईलवर अश्लील संदेश लिहून पाठविण्यात आले. ही बाब पीडित महिलेलाच्या लक्षात येताच तिने शहर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पीडितेच्या तक्रारीवरून अज्ञात मोबाईल धारक क्र. 7058725508 असलेल्या आरोपीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी पुढील तपास सायबर सेलकडे वर्ग करण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या