एक असा देश, जिथं भरतो तरुणींचा ‘बाजार’, पैसे देऊन खरेदी केली जाते नवरी

लग्नाचा सोहळा मग तो कोणत्याही धर्मातील असो मोठ्या धुमधडाक्यात पार पडतो… हिंदू धर्मात तर मुलगी पाहण्यापासून ते मुलगी सासरी जाईपर्यंत सुपारी फोडणे, साखरपुडा, मेहंदी, हळद आणि लग्न असे विविध टप्पे असतात… तसेच लग्नानंतरही मुलीचे स्वागत, सत्यनारायण पुजा, देवदेव असा प्रपंच असतो… हे झाले आपल्याकडे. पण एक असाही देश आहे जिथे तरुणींचा बाजार भरतो आणि नवरदेव पैसे देऊन पत्नीला खरेदी करून घेऊन जातो.

खरे तर मुलींचा बाजार मांडणे किंवा त्यांची विक्री करणे हे वाईट काम. मात्र बुल्गारिया या देशात तरुणींचा बाजार भरतो, ते देखील कोणत्याही आडकाठीविना. आई-वडीलच मुलीला घेऊन बाजारात जातात. या ठिकाणी नवरी खरेदी करण्यासाठी अनेक लोक येतात आणि येथे तरुणींची बोली देखील लागते. जास्त बोली लावणाऱ्यासोबत तरुणीचा विवाह लावून दिला जातो.

bulgaria-bride-market

बुल्गारिया या देशात स्तारा जागोर नावाचे एक ठिकाण आहे. येथे वर्षातून चार वेळा लग्नाला आलेल्या तरुणींचा बाजार ( Bride Market In Bulgaria) भरतो. रोमा समाजात ही प्रथा असून शेकडो वर्षापासून ही प्रथा सुरू असल्याचे येथील नागरिक सांगतात.

bulgaria-bride-market-1

या भागात मुलीला 14 वर्षाची होईपर्यंतच शिक्षण दिले जाते. यानंतर तिला शाळेतून काढून टाकले जाते. यामागे एक विचित्र कारण सांगण्यात येते. तरुणी लग्नायोग्य होईपर्यंत तिला खूप जपले जाते आणि घरकामाचे शिक्षण दिले जाते. कारण तरुणींच्या बाजारात नेण्यासाठी दोन अटी आहेत. एक तर तरुणीला घरकाम करता यावे आणि दुसरी म्हणजे तरुणी व्हर्जिन असावी. त्यामुळे बऱ्याचदा या बाजारात येणाऱ्या तरुणी या अल्पवयीन असतात.

bulgaria-bride-market-2

बुल्गारियामध्ये रोमा समाजाचे लोक जास्त नाही, परंतु गरिबी आणि जुन्या विचारांचा पगडा त्यांच्या मनावर कामय आहे. त्यामुळे आजही येथे तरुणींचा बाजार भरतो. विशेष म्हणजे मुलींनाही या परंपरेला विरोध नाही. मुली देखील सजून-धजून बाजारात येतात. येथे एका अल्पवयीन मुलीची 300 ते 400 डॉलरला विक्री होते.

मुलाकडचे देतात हुंडा

हुंडा देणे आणि घेणे आपल्याकडे गुन्हा असले तरी बुल्गारियाच्या या बाजारात हे सर्वमान्य आहे. तरुणाला तरुणी आवडल्यास त्याला तिच्या आई-वडिलांचेही मन जिंकावे लागते. यासाठी मुलाकडच्या लोकांना मुलीकडच्यांना हुंडा द्यावा लागतो.

आपली प्रतिक्रिया द्या