पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचा बैलगाडी मोर्चा

20

सामना प्रतिनिधी । अहमदपूर

केन्द्रातील व राज्यातील भाजपच्या सरकारने सर्वसामान्य जनतेला जीवन जगणे अवघड केले आहे. पेट्रोल, डिझेल व गॅसच्या किमतीत भरमसाठ वाढ केल्याने भाजप सरकारचा निषेध व्यक्त करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपजिल्हाअधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी मोर्चा काढण्यात येऊन उपजिल्हाअधिकारी यांना निवेदन देण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या वतीने इंधन दरवाढीच्या निषेध मोर्चात बैलगाडी मध्ये पेट्रोल, डिझेल माहगल्याने मोटारसायकल ठेवली होती तर गॅस महागाईचा निषेध म्हणून बैलगाडी मध्ये गॅस सिलिंडर ठेवून महागाईच्या विरोधात सरकारचा निषेध करण्यात आला.

निवेदनात इंधनाची महागाई कमी करा, मुग, उडीद यांचे हमीभावाचे खरेदी केन्द्र त्वरीत सुरू करा, गतवर्षीच्या तूर, हरबरा खरेदी केलेले पैसे देऊन ज्या शेतकऱ्याचे तुर, हरबरा माफ होऊ शकले नाही त्याना अनुदान देण्यात यावे. सध्या सोयाबीन पिकावर रोगराई पसरली असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्या सोयाबीनचे पंचनामे करून आर्थिक मदत करावी, मराठा, धनगर, मुस्लिम, लिंगायत समाजाला आरक्षण लागू करण्यात यावे अशा अनेक मागण्या साठी हातात फलक घेऊन शहरातील मुख्य रस्त्यावरून मोर्चा काढण्यात आला. सुरुवातीला जाधव यांच्या विजया पेट्रोल पंपावर सरकारचा निषेध म्हणून पेट्रोल, डिझेल भरण्यासाठी आलेल्या वाहनधारकांचा पुष्प देऊन सत्कार माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या निषेध मोर्चात राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवानंद हेंगणे, जिल्हा परिषदेचे गटनेते मंचकराव पाटील, राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष रामभाऊ नरवटे, माजी सभापती अॅड. टी एन.कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस गोविंदराव गिरी, महेश बँकेचे उपाध्यक्ष निवृत्तीराव कांबळे, महेश बॅकेचे संचालक शंकरराव जाधव, जिल्हा सरचिटणीस गोपीनाथ जोंधळे, व्यंकटराव करले, ग्रंथालयाचे जिल्हा अध्यक्ष सय्यद नबी, तालुका उपाध्यक्ष जिलाणी मनियार,भगवान ससाणे, नगरसेवक अभय मिरकले, सय्यद मुन्ना, अॅड. सय्यद अलीम, रवी तुपकर, महेश मोरे, विजू पवार, अनिस खुरेसी, चांद मिस्त्री, सुनील डावरे, महम्मद नाजीम यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्य़ा संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

आपली प्रतिक्रिया द्या