निलंगा तालुक्यातील कलांडी येथे वीज पडून बैलाचा मृत्यू

निलंगा तालुक्यातील कलांडी येथे वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाल्याची घटना आज सायंकाळी घडली. लातूर जिल्ह्यातील काही भागांत आज सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. निलंगा तालुक्यातील औराद शहाजनी परिसरातही विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडला.

यावेळी तालुक्यातील मौजे कलांडी येथील व्यंकट राम सूर्यवंशी यांचा बैल वीज पडल्याने मृत्युमुखी पडला. संबंधित पशुपालकास प्रशासनाकडून तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.