संभाजीनगरात हिंदूंच्या मंदिरांवर बुलडोझर, मशिदींसमोर शेपूट घातले

54

सामना ऑनलाईन, संभाजीनगर

न्यायालयाच्या आदेशावरून मनपा प्रशासनाने धार्मिक स्थळांची पाडापाडी सुरू केली आहे. मात्र या कारवाईत सरळ सरळ पक्षपात करण्यात आला असून तीन दिवसांत २७ मंदिरांवर बुलडोझर चालवण्यात आला असून मशिदींसमोरून मात्र हे पथक शेपूट घालून पळाले. मनपा प्रशासनाच्या या कारवाईमुळे हिंदूंमध्ये संतापाची लाट असून मंदिरे विद्रूप करण्याचे हे षड्यंत्र थांबवण्याची मागणी होत आहे.

मंदिरांतील देवदेवतांच्या मूर्ती अक्षरशः पहारी लावून काढण्यात आल्या. शहरात शेकड्यांनी अतिक्रमित मशिदी आहेत, रस्त्याच्या मधोमध अनेक दर्गे आहेत पण त्यांना हात लावण्याचा दम मनपा प्रशासनाने दाखवला नाही.

हिंदूंची मंदिरे विद्रूप करण्याची ही सुपारीबाज मोहीम थांबवण्यात यावी या मागणीसाठी शिवसैनिकांनी मंगळवारी मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांना दोन तास घेराव घातला तर शिवसेना उपनेते खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेऊन कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणारी ही कारवाई थांबवण्याचे आवाहन केले.

आपली प्रतिक्रिया द्या