माजी आमदार आणि नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटात सामील झालेल्या बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार झाला आहे. सिद्दीकी यांच्यावर दोन ते तीन राऊंड फायर झाले असून एक गोळी लागली आहे. त्यांना उपचारासाठी लीलावती रुग्णालयात दाखल झाले करण्यात आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.