एटीएम कार्डाचा पिन नंबर सांगितला नाही म्हणून चोराने केला बलात्कार

rape
प्रातिनिधिक फोटो

दिल्लीतील जंगपूरा भागातील एका घरात चोरी करण्याच्या उद्देशाने घुसलेल्या चोराने त्या घरातील महिलेचा बलात्कार केल्याचे समोर आले आहे. पीडित महिलेने तिच्या एटीएम कार्डाचा पीन नंबर न दिल्याने त्याने तिच्यावर बलात्कार केला. या प्रकरणी पोलिसांनी त्या चोराला अटक केली आहे. सोनू असे त्या चोराचे नाव असून त्याने याआधीही बऱ्याच चोऱ्या केल्या आहेत.

पीडित महिला घरात एकटी असताना सोनू तिच्या घरात घुसला. त्यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवत महिलेचे दागिने व घरातील कॅश लुटली. त्यानंतर त्याने तिच्याकडून एटीएम कार्ड मागितले. महिलेने एटिएम कार्ड दिले मात्र त्याचा पिन नंबर देण्यास नकार दिला. त्याने तिला जीवे मारण्याची धमकी दिली मात्र महिला ऐकत नसल्याने तो चिडला. त्यानंतर त्याने चाकूचा धाक दाखवत तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तो तिथून निघून गेला. महिलेने तत्काळ याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली. सोनू इमारतीत येतानाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याने पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. तसेच त्याच्या जवळील चोरीचे सामान देखील जप्त केले.

आपली प्रतिक्रिया द्या