बर्मा टोस्ट

रविवारी बऱ्याचदा नाश्त्याला काय करायचे हा मोठा प्रश्नच असतो. नेहमी नेहमी ते ब्रेड ऑम्लेट खाऊन कंटाळा आला असेल तर बर्मा टोस्ट हा प्रकार ट्राय करा. हा ऑम्लेटचाच एक प्रकार पण त्याला थोडा सॅण्डवीज टच दिला आहे. खायला अगदी चविष्ट असा बर्मा टोस्ट करायलाही अगदी सोप्पा आहे.

साहित्य – ब्रेड, अंडी, बटर, चीझ, मीठ, काळीमीरी पावडर, बारिक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची यांचे एकत्र मिश्रण, पुदिना कोथिंबीर चटणी,

कृती – एका वाडग्यात दोन अंडी फोडून घ्या. त्यात मीठ व काळीमीरी पावडर टाकून चांगलं फेटून घ्या. ब्रेड स्लाईसच्या एका बाजूला बटर व पुदिना चटणी लावा. त्यावर बारिक चिरलेला टोमॅटो, कांदा आणि शिमला मिरची यांचे मिश्रण पसरवा. त्यावर चीझ किसून टाका. वरुन थोड मीठ टाका. गरम तव्यावर थोडा बटर टाकून त्यावर तयार केलेले ब्रेडचे सॅण्डवीज ठेवा. वरुन चमच्याने थोडं थोडं अंड्याचे मिश्रण सगळीकडे पसरवा. ब्रेडच्या कडांच्या बाहेर गेलेले मिश्रण चमच्याने ब्रेडला चिकटवा. ब्रेड खालून चांगला टोस्ट झाला की परता. दुसऱ्या बाजूने चांगला भाजून घ्या. गरमा गरम बर्मा टोस्ट तयार आहेत. सॉस सोबत सर्व्ह करा.