उदगीरजवळ बसला अपघात, एकाचा मृत्यू ५० जखमी

20

सामना प्रतिनिधी । उदगीर

उदगीर शहराजवळील शेल्हाळ गावाच्या हद्दीमध्ये कर्नाटक महामंडळाच्या बसला अपघात झाला आहे. एका पुलाजवळून जात असताना नियंत्रण सुटलेली बस १० ते २० फुट खोल खड्ड्यात पलटी झाल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले. या अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे, तर ५० प्रवासी जखमी झाले आहेत.

औराद बाऱ्हाळी येथून कर्नाटक महामंडळाची बस (क्र. ३८ एफ ५३८) ही उदगीरकडे येत होती. खचाखच भरलेल्या बसवरील नियंत्रण सुटल्याने ती पुलाजवळ पलटी झाली. बसमध्ये तब्बल ५१ प्रवासी होते. अपघातामध्ये ममता रमेश सगर (२२) या तरुणीचा मृत्यू झाला असून ५० जण जखमी झाले आहेत. जखमी प्रवाशांना उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद उदगीर ग्रामिण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या