दुचाकीला वाचवताना बस उलटली, ४ ठार ३० जखमी

31

सामना ऑनलाईन । वर्धा

वर्धा येथे एका दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नात ट्रॅव्हल बस उलटली आणि भीषण अपघात घडला. या अपघातात ४ जण जागीच ठार झाले तर ३० जण जखमी आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वर उपचार सुरू करण्यात आल्याचे कळते.

नागपूर येथून हिंगणघाटला जाताना एक ट्रॅव्हल्स बस जामनजीक शेडगाव मार्गावर पोहोचली. येथे समोरून एक दुचाकी येत होती. तिला धडक बसू नये म्हणून चालकाने गाडी वळवून ब्रेक लावला पण त्यात बस पलटी झाली. या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला आणि ३० जण जखमी झाले. गावकऱ्यांनी पोलिसांना या अपघाताची माहिती दिली आणि जखमींना रुग्णालयात दाखल केले, अशी माहिती खासगी वृत्तवाहिन्यांवरून देण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या