मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर बस उलटली, १ चिमुरडी ठार ३० जखमी

50

सामना ऑनलाईन । पुणे

मुंबई-पुणे एक्स्प्रेस महामार्गावर मंगवारी सकाळी एक बस उलटून झालेल्या अपघातात एका चिमुकलीचा मृत्यू झाला असून ३० प्रवासी जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरू करण्यात आला आहे. बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात घडल्याची प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.

५२ प्रवाशांना मुंबईहून पुण्याकडे जाणारी एक खासगी बस वळवण पुलावर पोहोचली असताना बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने पलटली. यामुळे झालेल्या अपघातात एका चार वर्षाच्या चिमुरडीचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य ३० जण जखमी झाले. जखमींमध्ये लहान मुलांची संख्या अधिक असून अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे.
सर्व जखमींना निगडीतील लोकमान्य रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या