नांदेडमध्ये ट्रकच्या धडकेने बस उलटली

सामना प्रतिनिधी । नांदेड

नांदेडमध्ये शनिवारी सकाळी धनेगाव चौकात एका ट्रकने एसटी बसला दिलेल्या धडकेत बस उलटली. या अपघातात कोणतीही जिवीत हानी झाली नसून एक महिला जखमी झाली आहे. जखमी महिलेवर नांदेडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बसमधील इतर प्रवासी सुखरूप आहेत.

नांदेड बसस्थानकातून बस देगलूरकडे जाण्यासाठी रवाना झाली होती. धनेगाव चौकात ७:१५च्या सुमारास एसटी बसच्या मागून येणाऱ्या ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने ट्रकने बसला जोरदार धडक दिली. या धडकेत बस उलटली. बसमध्ये जास्त प्रवासी नव्हते. अपघात झाल्याची माहिती मिळताच स्थानिक पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत सर्व प्रवाशांना बसबाहेर काढले. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नसल्यामुळे मोठा अनर्थ ठळला.

आपली प्रतिक्रिया द्या