त्रिवेणी धामहून परतणाऱ्या भाविकांची बस नेपाळमध्ये उलटली; 5 जणांची प्रकृती गंभीर

मौनी अमावस्येनिमित्त नेपाळच्या त्रिवेणी धामहून स्नान करून परतणाऱ्या भाविकांची बस उलटली आहे. या बसमध्ये 70 हिंदुस्थानी भआविक होते. अपघातातील 5 जणांची प्रकृती गंभीर असून अनेकजण जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या महाराजगंपासून नेपाळच्या सीमेत ही बस उलटली आहे. बसवरचा चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला आहे.

बसमध्ये गोरखपूरच्या पीपीगंज आणि कॅम्पियरगंजमधील 70 भाविक होते. ते मोनी अमावस्येनिमित्त त्रिवेणी धामला स्नानासाठी गेले होते. तेथून परतताना हा अपघात झाला आहे. अपघातातील 5 जणांची प्रकृती गंभीर असून इतर 55 जण जखमी झाले आहेत. नेपाळच्या परासी जिल्ह्यातील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

मौनी अमावस्येला त्रिवेणी धामममध्ये स्नान आणि दानधर्माचे अनन्यसाधारण महत्त्व असल्याची मान्यता आहे. त्यामुळे या पर्वणीला अनेक भाविक त्रिवेणी धामला जातात. तेथून परतताना हा अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच नेपाळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे.