यूपी-राजस्थान सरकारचे ‘बस वॉर’; बस टू-थ्री व्हीलरच्या नावाने रजिस्टर, काँग्रेसचा दावा

881
ashok-gehlot

उत्तर प्रदेश आणि राजस्थान सरकारमध्ये विद्यार्थ्यांसाठी सोडण्यात आलेल्या बस वरून राजकारण सुरूच आहे. या दरम्यान राजस्थान काँग्रेसने उत्तर प्रदेशच्या विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी कोटा येथे आलेल्या बसचा नंबर काढून दावा केला आहे की हे नंबर टू व्हीलर आणि थ्री व्हीलरच्या नावाने रजिस्टर्ड आहेत.

राजस्थान काँग्रेसने दावा केला आहे की, उत्तर प्रदेशच्या लिस्ट मधील बस टू व्हीलर, ऑटो थ्री व्हीलरच्या नावावर रजिस्टर्ड आहेत. असे असताना देखील ते काँग्रेसच्या बसवरून टीका करत आहेत. राजस्थान सरकार आणि उत्तर प्रदेश सरकार मध्ये या वादाला सुरुवात झाली तीच मजुरांसाठीच्या बस चालवण्यावरून. काँग्रेसने श्रमिकांसाठी एक हजार बस चालवण्याची तयारी दर्शवली होती.

योगी सरकारचा दावा

काँग्रेसच्या या प्रस्तावाला उत्तर प्रदेश सरकारने मान्य करून आणि बसची लिस्ट मागितली होती. काँग्रेसने एक हजार बसची लिस्ट पाठवली होती. उत्तर प्रदेश सरकारचा दावा होता की काँग्रेसच्या लिस्ट मध्ये टू व्हीलर, ऑटो थ्री व्हीलर गाड्यांचे नंबर होते. यासोबतच बसमध्ये आवश्यक कागदपत्रे नव्हते. त्यामुळेच त्यांना मंजुरी देण्यात आली नाही.

काँग्रेसच्या सुमारे 500 बस आग्रा-राजस्थान सीमेवर उभ्या होत्या, मात्र यूपी सरकारने त्यांना आत येण्याची परवानगी दिली नाही. त्यानंतर बस परतल्या. यानंतर काँग्रेसने योगी सरकारवर श्रमिकांच्या नावाखाली राजकारण केल्याचा आरोप केला होता. यानंतर योगी सरकारने एक बिल सार्वजनिक केले होते.

कोटा येथून काही विद्यार्थ्यांना घेऊन आलेल्या बसचे ते बिल होते. तब्बल 36 लाख रुपयांचे ते बिल होते. या बिल वरून भाजपने राजस्थान सरकार आणि काँग्रेसवर निशाणा साधला. तसेच बिल भरल्याचे सांगितले.

राजस्थान सरकारचे परिवहन मंत्री प्रतापसिंह खाचरियावास यांनी यूपी सरकारचे आरोप फेटाळले. यूपी सरकारने डिझेल बिल देणार असे सांगितले होते त्याचे हे बिल असून 36 लाखांपैकी केवळ 19 लाख रुपये भरले आहेत, दोन्ही सरकारच्या सहमतीनेच हे बिल मंजूर करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या