क्षीरसागरांच्या सुनबाईंचे सामाजिक दायित्व; दुष्काळात हजारो महिलांच्या चुली पेटवल्या

1161

राजकारण करत असताना समाजालाही सांभाळण्याचे आणि जोपासण्याचे काम क्षीरसागर कुटुंबाने अविरत केले आहे. हाच वारसा रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या सून सारिका क्षीरसागर यांनी पुढे चालवल्या. सामाजिक बांधिलकी पार पाडताना बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळात हजारो महिलांच्या चुली पेटवण्याचे काम समर्थपणे पार पाडले. तब्बल बारा हजार महिलांना विविध उद्योगाचे प्रशिक्षण दिले. बचत गटाच्या महिलांना हाताला काम मिळवून दिले. त्यांनी उत्पादीत केलेल्या वस्तूंना बाजारपेठा उपलब्ध करून दिल्या.

बीडमध्ये क्षीरसागर कुटुंबाने गरिबांना मदतीचा हात आणि आधार देण्याचे काम सदैव केले आहे. रोहयो मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सामान्य लोकांसाठीची धडपड नेहमी जाणवते आणि दिसते. पन्नास वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत क्षीरसागर  कुटुंबाने गोरगरिबांच्या चुली पेटवण्याचे काम केले. हाच वारसा कायम ठेवण्याचा प्रयत्न डॉ. सारिका योगेश क्षीरसागर यांनी यशस्वीपणे केला. गत वर्षभरात डॉ.सारिका क्षीरसागर यांनी शहरासह ग्रामिण भागातील महिलांचे बचत गट स्थापन करून त्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्यासाठी आणि सहज शक्य होणारा घरगुती उद्योग उपलब्ध करून देण्यासाठी जयदत्त क्षीरसागर यांच्या ताब्यात असणाऱ्या गजानन बँकेकडून मदत मिळवून दिली. या बँकेच्या मदतीमुळे बचत गटाच्या महिला गृह उद्योगामध्ये उतरल्या. उद्योगाचे ज्ञान प्राप्त केलेल्या या महिलांना सारिका क्षीरसागर यांनी उद्योगाचे प्रशिक्षण दिले. तब्बल बारा हजार महिला स्वयंसिद्ध झाल्या. अजूनही जवळपास साडेचार ते पाच हजार महिला घरगुती उद्योग करून संसाराला हातभार लावत आहेत. बीड जिल्ह्यामध्ये या महिलांच्या माध्यमातून उत्पादीत होणाऱ्या वस्तुंना मुंबई, पुणेसारख्य मेट्रो सिटीमध्ये बाजारपेठ उपलब्ध करून दिली. या सर्व धडपडीमुळे बीड जिल्ह्यातील भीषण दुष्काळात बीड शहरातील आणि ग्रामिण भागातील महिलांना आर्थिक आधार मिळाला. कुटुंबाची उपजिविका भागवता आली. मुलांचे शिक्षण करता आले. घरातल्या चुली पेटल्या. हे बारा हजार कुटुंब आज संसार गाडा यशस्वीपणे चालवत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या