बांधकाम व्यावसायिकाच्या अपहरणाचा प्रयत्न; दोघे अटक

41

सामना प्रतिनिधी । पुणे

शहरातील एका बांधकाम व्यावसायिका पाच कोटी रूपयांची खंडणी मागून पिस्तुलच्या धाकाने त्याचे अपहरण करण्याचा प्रयत्न डेक्कन येथील नदीपात्राजवळ घडला. मात्र, या बांधकाम व्यावसायिकाने प्रसंगावधान राखून गाडीतून उडी मारून स्वत:ची सुटका करून घेतली. यातील मुख्य सुत्रधारासह दोघांना शनिवारी रात्री उशीरा डेक्कन पोलिसांनी अटक केली. महिलेसह दोघे फरार आहे. महेंद्र शांताराम बोडके (२८) आणि कार्तिक कानोरे (२५) या दोघांना अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत बांधकाम व्यवसायिक आळंदी परिसरातील रहातात. अपहरणासाठी मदत करणारी महिला त्यांच्या ओळखीची आहे. बांधकाम व्यावसायिकाचे अपहरण केल्यास पैसे मिळतील या उद्देशाने तिने महेंद्र बोडकेच्या मदतीने त्यांच्या अपहरणाचा व खंडणीचा कट रचला. शुक्रवारी रात्री साडे बाराच्या सुमारास तिने या बांधकाम व्यावसायिकाला सदाशिव पेठेतील जागा विकसीत करायची आहे, त्याचे कागदपत्र पाहण्यासाठी म्हणून डेक्कन चौपाटीतील नदीपात्रात बोलावून घेतले.

बांधकाम व्यावसायिक त्या ठिकाणी गेल्यानंतर बोडके आणि ती महिला त्यांना भेटली. त्यांच्यासोबत आणखी दोघे होते. त्यांना चर्चा करण्याच्या बहाण्याने त्यांना पांढNया रंगाच्या स्विफ्ट कारमध्ये बसवले. आचानक डोक्याला पिस्तूल लावून जिवे ठार मारण्याची धमकी देत पाच कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यावेळी कारमधून त्यांना तेथे घेऊन जात असताना चालत्या गाडीतून उडी मारून तेथून पळून गेले. शनिवारी बांधकाम व्यावसायिकाने डेक्कन पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात फिर्याद दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल करुन महेंद्र बोडकेसह कानोरेला रात्री उशीरा केली.

आपली प्रतिक्रिया द्या